जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुंबईकरांनो दिवाळीतही तुम्ही कामावर जाणार असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
कारण दिवाळीचे 4 दिवस तुम्हाला डबा मिळणार नाही. 18 ते 21 ऑक्टोबर मुंबईचे डबेवाले सुट्टीवर जाणार आहेत.
दिवाळीनिमित्त 4 दिवस मुंबईचे डबेवाले सुट्टी घेणार आहेत. 23 ऑक्टोबरपासून डबेवाल्याची सेवा पूर्ववत होणार आहे. त्यामुळे सुट्टीच्या दिवसातील पगार कापू नये आणि दिवाळी बोनस म्हणून एक जादा पगार देण्याची मागणी डबेवाल्यांनी केली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.