मुंबईत पेट्रोल पंपावर सिलेंडरचा स्फोट, 3 जण जखमी

मुंबईत पेट्रोल पंपावर सिलेंडरचा स्फोट, 3 जण जखमी

मुंबईत रिक्षामध्ये गॅस भरताना सिलेंडरचा स्फोट झाला आहे, कांदिवली पश्चिमेच्या मिलाप पेट्रोल पंपावर ही घटना घडली आहे.

सकाळी गॅस भरण्यासाठी या पेट्रोल पंपवर गाड्यांची रिक्षाची रांग लागलेली होती आणि याच दरम्यान एका रिक्षमध्ये सीएनजी गॅस भरत असताना हा स्फोट झाला.

या घटनेमध्ये 2 रिक्षाचालक आणि पेट्रोल पंप वर वरील कर्मचारी असे तीन जण जखमी झाले असून त्यांच्यावर तुंगा हस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

याशिवाय या घटनेत रिक्षा आणि पेट्रोल पंपचा मोठा नुकसान झालं, यामध्ये प्राथमिक माहितीनुसार ह्या रिक्षमध्ये जादाचा गॅस भरला गेल्यामुळे हा स्फोट झाल्याचं सांगण्यात येतं आहे.

मात्र हा स्फोट कसा झाला याचा तपास कांदिवली पोलीस करत आहेत. तसेच  स्फोट  झाल्यानंतर जखमी झालेले रिक्षा चालक अनिल मोरे यांच्या नातेवाईकांनी पेट्रोल पंप कर्मचारी यांनी मदत नाही केली असा आरोप केला आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version