पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून नुकसानग्रस्तांना मदत जाहीर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून नुकसानग्रस्तांना मदत जाहीर

महाराष्ट्रासह देशातील काही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना तौत्के चक्रीवादळाचा तडाखा बसला. या चक्रीवादळामुळे अनेक जण मृत्युमुखी पडले, तर काहींचे प्रचंड आर्थिक नुकसान झालें आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकसानग्रस्तांना मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान मोदी त्यांनी ट्विटच्या माध्यमातून ही माहिती दिली.

पंतप्रधानांनी केरळ, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान या राज्यांतील, तसेच दमण आणि दीव, दादरा – नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांमध्ये चक्रीवादळाच्या दरम्यान मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना दोन लाख रुपये दिले जाणार असून गंभीर जखमींना ५० हजार रुपये भरपाई देण्याची घोषणा केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version