बिपारजॉय चक्रीवादळ गुजरातच्या दिशेनं सरकलं

बिपारजॉय चक्रीवादळ गुजरातच्या दिशेनं सरकलं

बिपारजॉय चक्रीवादळ गुजरातच्या दिशेनं सरकलं असून अरबी समुद्राला मोठे उधाण आले आहे. मुंबईच्या किनारपट्टीवर समुद्राने भयाण रूप धारण केले आहे. उंच लाटा उसळत असल्याने किनाऱ्यावर कुणी जाऊ नये अशा सूचना करण्यात आल्या आहेत. मुंबईत हे वादळ येणार असले तरी सोसाट्याच्या वाऱ्याने शहरात अनेक झाडांची पडझड झाली आहे. तर या वादळी वाऱ्यामुळे गुजरातमध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. हे वादळ गुजरातच्या किनारपट्टीला धडकणार असून कच्छ आणि सौराष्ट्राला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा गुजरातच्या दिशेने प्रवास सुरू झाला आहे. असे असले तरी मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून जोरदार वाऱ्यामुळे ५० ठिकाणी झाडे-फांद्या कोसळणे, घराचा भाग कोसळणे, शॉटसर्किटच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये सहाजण जखमी झाले आहेत. जुहू येथील समुद्रात पोहण्यासाठी गेलेली पाच अल्पवयीन मुले सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास बुडाली.

किनारपट्टीवर ‘बिपरजॉय’ वादळामुळे मुंबईत जोरदार वारे वाहत आहेत. यामुले समुद्रात उंच लाटा उसळत होत्या. जोरदार वाऱ्यामुळे धुळीचे लोट उठले होते. तसेच वेगाने वारे वाहत आहेत. आज देखील हीच परिस्थिती राहणार आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या आपत्कालीन विभागाने सज्जता ठेवली आहे. चक्रीवादळामुळे १४ जून आणि १५ जून दरम्यान गुजरातमधील कच्छ, द्वारका, पोरबंदर, जामनगर राजकोट, जुनागड आणि मोरबी जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. चक्रीवादळामुळे हे सर्व जिल्हे प्रभावित होणार आहेत.

जामनगर परिसरात अनेक तेल कंपन्यांच्या रिफायनरी, सोबतच कांडला पोर्ट देखील असल्याने चक्रीवादळामुळे मोठं आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बिपारजॉयचं लॅंडफॉल १५ जून रोजी झाल्यानंतर गुजरात, राजस्थान आणि दिल्लीपर्यंत त्यापुढील दोन तीन दिवसात पावसाची शक्यता आहे. या वादळामुळे रेल्वेसेवेवर देखील परिणाम झाला आहे. तब्बल ६४ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version