आंतरराष्ट्रीय बाजारातून मोठी बातमी समोर आली आहे. अमेरिका आणि इराणमध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेला संघर्ष सध्या निवळल्याचे पाहायला मिळत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका इराणवरील हल्ले थांबवत असल्याची मोठी माहिती दिली आहे. इराण आणि अमेरिका युद्धाचे गंभीर परिणाम भारतासह अन्य देशांवरही होत होते. अशातच ट्रम्प यांनी केलेल्या मोठ्या घोषणेनंतर आता जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठी घसरण झाली.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरांमध्ये सुमारे 6 टक्क्यांची घट दिसून आली. त्यामुळे ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 90 डॉलर या अत्यंत महत्त्वाच्या पातळीच्या खाली घसरली आहे. अमेरिकन कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल 44 डॉलर्स इतका आहे. तर तणाव कमी झाल्यामुळे जगातील सर्वात महत्त्वाचा तेल पुरवठा मार्ग असलेल्या 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जहाजांची वाहतूक हळूहळू पूर्ववत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
गेल्या काही महिन्यांपासून अमेरिका इराणवर मोठे हल्ले करत होते, त्यामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढताना दिसले. अशातच आता अमेरिका इराणवरील हल्ले थांबवल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव घसरले आहेत. दरम्यान याचा कोणताही परिणाम पेट्रोल डिझेलच्या दरात अद्याप तरी झालेला नाही. देशातील दिल्ली, मुंबई चेन्नई आणि कोलकाता या चार शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झाला नसून सध्या दर कमी होतील याची कोणतीही चिन्हे पाहायला मिळत नसल्याचे दिसते आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.