Mumbai Crime: हा कसला शौक! चक्क घरात पाळली होती जिवंत मगर; वन विभाग व क्राईम ब्रँचच्या कारवाईनंतर सर्व प्रकार उघडकीस

अनेक प्राणीप्रेमींना आपल्या घरात कोणता न कोणता प्राणी पाळण्याची आणि त्याला आपल्या घरात ठेवण्याची आवड असते. मात्र मुंबईच्या पॉश जुहू परिसरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
Mumbai Crime: हा कसला शौक! चक्क घरात पाळली होती जिवंत मगर; वन विभाग व क्राईम ब्रँचच्या कारवाईनंतर सर्व प्रकार उघडकीस

अनेक प्राणीप्रेमींना आपल्या घरात कोणता न कोणता प्राणी पाळण्याची आणि त्याला आपल्या घरात ठेवण्याची आवड असते. यात आपण कुत्रा, मांजर, ससा यांसारखे प्राणी अनेकांच्या घरी पाहतो. पण असं कधी झालं आहे का? एखाद्या व्यक्तीने आपल्या घरात चक्क मगरीला पाळलं असेल… मुंबईच्या पॉश जुहू परिसरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जुहू येथील एका घरातून जिवंत मगर पाळल्याची बातमी समोर आली आहे. जुहू, जे. आर. म्हात्रे मार्गावरील रुईया पार्क परिसरातील मोरगाव शंकर चाळ येथील एका निवासी इम्रान शेख (29) या व्यक्तीने त्याच्या घरात बेकायदेशीर रित्या एक जिवंत मगर आणि इंडियन स्पॉटेड कासव पाळल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानंतर वन विभाग आणि, मुंबई क्राईम ब्रांच युनिट-9 आणि ‘सर्प इंडिया’ NGO यांची संयुक्त कारवाईत हा प्रकार उघडकीस आला. इम्रान शेख याच्यावर वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. घरातील काचेच्या टँकमध्ये आरोपीने हे मगर व कासव ठेवले होते. हे दोन्ही प्राणी शेड्युल-1 संरक्षित प्रजातीचे असल्याचे समोर आले आहे. खासगीरीत्या अशा प्राण्यांचे संगोपन करणे कायद्याने गुन्हा आहे. आता हे दोन्ही प्राणी सुरक्षितपणे रेस्क्यू करून वन विभागाकडे सुपूर्द करण्यात आले. जप्त करण्यात आलेले मगर पिल्लू आणि कासव वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले असून, त्यांची वैद्यकीय तपासणी व योग्य पुनर्वसनासाठी पुढील प्रक्रिया सुरू आहे. जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version