राज्यात कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ

राज्यात कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ

राज्यात टाळेबंदी लागू करूनही कोरोनाची रुग्णसंख्या वाढतानाच दिसत आहे. बुधवारी दिवसभरात ५७ हजार ६४० नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील आतापर्यंतची एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४८ लाख ८० हजार ५४२ इतकी झाली आहे. यापैकी ६ लाख ४१ हजार ५९६ सक्रीय रुग्ण आहेत. तर राज्यात दिवसभरात ९२० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

राज्यातील आतापर्यंतचा एकूण मृतांचा आकडा ७२ हजार ६६२ इतका झाला आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर १.४९ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.कोरोनाबाधित रुग्णसंख्येपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या कमी असली तरी दिवसभरात एकूण ५७ हजार ००६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version