जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन आलेला दावा अखेर, लोक अदालतीत निकाली निघाला आहे.
50 वर्षानंतर नालासोपाऱ्यातील एका प्रॉपर्टीचा वाद मिटवण्यात लोक अदालत यशस्वी ठरली.
हा वाद सामंजस्याने सोडवण्यात राष्ट्रीय लोक अदालतीमधील न्यायाधीश सुरेखा सिन्हा यांना यश आले.
1967 ला झालेल्या प्रॉपर्टी वादात पांडुरंग पाटील आणि गोविंद पाटील यांनी एकमेकांविरोधात ठाणे,पालघर,वसई,मुंबई उच्च न्यायालय व सुप्रीम कोर्टापर्यंत दावे दाखल
केले होते. मात्र अवघ्या 50 वर्षानंतर याचा सामंजस्याने निकाल लावण्यात आला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.