जय महाराष्ट्र न्यूज, उल्हासनगर
उल्हासनगरमध्ये प्रेमी युगुलांची लुटूकरून त्यांच्यी हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. एका प्रेमी युगुलांना लुटून त्यांच्यी हत्या करणाऱ्या २५ वर्षीय संजय नरवाडे या रिक्षा चालकाला उल्हासनगर येथून ठाणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. आरेपीकडून एक परदेशी बनावटीचे रिव्हॉल्व्हर, जिवंत आणि रिकाम्या काडतुसा तसेच मोबाईल फोन ठाणे ग्रामीण पोलिसांनी हस्तगत केला आहे.
सदर घटना ५ मार्च रोजी अंबरनाथ येथील ग्रीन हिल्स रिसॉर्ट येथे घडली होती. संजय नरवाडेने या पूर्वी देखील अश्या अनेक घटना केल्या असल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली आहे. ठाणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील ६ दिवसापूर्वी अंबरनाथ-टीटवाळा हद्दीच्या नालिंबी भागातील डोंगरावर रात्रीच्या सुमारास आपल्या प्रेयसीसोबत असलेल्या गणेश दिनकरची ४ गोळ्या मारून हत्या करण्यात आली होती.
नंतर आरोपी संजयने गणेशच्या प्रेयसीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. या घटनेतील आरोपीबाबत पोलिसांकडे कुठलीही माहिती नव्हती. या गुन्ह्यातील आरोपीला शोधून काढण्यासाठी पोलिसांनी पीडित तरुणीने केलेल्या वर्णनावरून आरोपीचा स्कॅच जारी केले होते.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.