वैभव नाईक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची पुन्हा नोटीस देण्यात आली आहे. चौकशीसाठी २८ तारखेला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. वैभव नाईक उद्धव गटाचे आमदार आहेत. आर्थिक व्यवहारांची चौकशी होणार आहे.
आमदार वैभव नाईक यांची मालमत्तेची चौकशी करण्यासाठी रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय यांच्याकडून यापूर्वीही चौकशी करण्यात आली होती. त्यांचे राहते घर त्याचप्रमाणे त्यांनी बांधलेली बांधकामांची चौकशी करण्यात आली होती. तर, ज्या ग्रामपंचायतने आमदार निधी दिली त्यांचीही चौकशी करण्यात आली होती. त्या-त्या विभागांना नोटीसा बजावलेल्या होत्या मात्र आता पुन्हा एकदा आमदार वैभव नाईक यांची चौकशी होणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.