सध्या चलनात असलेली दोन हजार रुपयांची नोट वितरणातून काढून टाकण्याचा निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकेने दिला आहे. यार अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. तर, राजकीय वर्तुळात टीका टिप्पण्या सुरु झाल्या आहेत.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी देशात नोटबंदी जाहीर केली होती. देशातल्या ५०० आणि १,००० रुपयांच्या चलनी नोटा त्या दिवसापासून व्यवहारातून रद्द करण्यात आल्या. त्यानंतर केंद्र सरकारने ५०० आणि २,००० रुपयांच्या दोन नवीन चलनी नोटा बाजारात आणल्या होत्या. यापैकी २,००० रुपयांची नोट आता बंद करण्यात आली आहे. ‘भ्रष्ट लोकांनाच नोटवापसीचा त्रास’ होणार असल्याचे बोलत ‘नोटा आल्या कुठून हे सांगावे लागणार’ असे खोचक वक्तव्य अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.