सिंधुदूर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात वर्षा पर्यटनाला बंदी असताना देखील जिल्ह्यातील अनेक धबधब्यांवर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे. स्थानिक प्रशासनाने पर्यटन स्थळ बंद करून देखील हौशी पर्यटक आंबोली येथे दाखल झालेत मुख्यत्वे बेळगाव, कोल्हापूर व, गोवा या ठिकाणचे पर्यटक धबधब्यांकडे दाखल झालेत. आंबोली पोलिसांचा चोख बंदोबस्त असून पोलिसाची गाडी गस्त घालते तरी देखील पर्यटक आंबोलीच्या पर्यटनाचा आस्वाद लुटण्यासाठी मोठ्या संख्येने आंबोलीत गर्दी करत आहेत. पोलिसांनी काही पर्यटकांना त्या ठिकाणाहून माघारी पाठवलं तर काही पर्यटकांवर दंडात्मक कारवाई सुद्धा केली आहे.
सध्या सिंधुदुर्ग जिल्हाचा चौथ्यास्थरात समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे प्रशासनाने बंद केली आहेत. मात्र कोल्हापूर व कर्नाटकातून येणारे पर्यटक गोव्याला जातो म्हणून सांगत आंबोलीतील धबधब्यांचा आस्वाद आणि त्या ठिकाणच्या अल्हाददायक वातावरणाचा आनंद लुटण्यास येताना दिसत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.