कोरोना निर्बंधात ३० नोव्हेंबरपर्यंत वाढ

कोरोना निर्बंधात ३० नोव्हेंबरपर्यंत वाढ

  देशात दिवाळी सण काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे. सण-उत्सवांच्या दरम्यान बाजारांत ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. मात्र गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने कोरोना संबंधित निर्बंधात वाढ केली आहे. येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत सरकारकडून आखण्यात कोरोना निर्बंधांचे पालन करणे नागरिकांना बंधनकारक असणार आहे.

  देशातील कोरोनाग्रस्त परिस्थिती काही प्रमाणात आटोक्यात आली असल्यामुळे देशातील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. दीड वर्षांपासून बंद असलेले सर्व उद्योग तसेच अनेक कारभार पुन्हा सुरू करण्यात आले. मात्र, अद्यापही देशात कोरोनाचे रुग्ण काही प्रमाणात आढळत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने कोरोना नियमांचे पालन करण्याचे निर्देश नागरिकांना दिले आहे.

 कोरोना पार्श्वभूमीवर कोरोना नियमांचे पालन करणे नागरिकांना बंधनकारक असून येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत देशातील निर्बंध वाढवण्यात आले आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कोरोनासंबंधी निर्बंधांचे आदेश जारी केले होते. सरकारने आखलेल्या कोरोना संबंधीत निर्बंध येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version