देशात कोरोनाचा फैलाव वाढतोय

देशात कोरोनाचा फैलाव वाढतोय

देशातील वेगवेगळ्या राज्यात पुन्हा एकदा करोना संसर्गाचे रुग्ण वाढत आहे. मागील संपूर्ण आठवड्यात २५,००० हजारांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद भारतात झाली असून गेल्या तीन महिन्यातील सर्वाधिक आकडा आहे. तसंच, गेल्या सात दिवसांच्या तुलनेत मागील आठवड्यात ४५ टक्के नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तर मृत्यू दर मात्र कमी आहे. यातील महाराष्ट्र आणि केरळा या दोन राज्यात सर्वाधिक रुग्णवाढ होत आहे.  देशातील ६० टक्के रुग्ण हे या दोन राज्यातील आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून रविवारी दिवसभरात एकूण १ हजार ४९४ रुग्णांना करोनाची लागण झाली आहे.

३० मे ते ५ जून या आठवड्यात देशात २५, ३०० नवीन करोना रुग्णांची नोंद झाली आहे. यातील महाराष्ट्र आणि केरळा या दोन राज्यात सर्वाधिक रुग्णवाढ होत आहे. देशातील ६० टक्के रुग्ण हे या दोन राज्यातील आहे. याआधी मार्च ७- १३ या आठवड्यात देशात २५,००० रुग्ण आढळले होते. त्यानंतर तब्बल तीन महिन्यांनंतर रुग्णसंख्येने पुन्हा उचल खालली आहे. केरळामध्ये ८ हजार नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. या मागील आठवड्याच्या तुलनेत आठवड्यात ६५% वाढ झाली आहे. तर, महाराष्ट्रात ७२५३ नवीन रुग्ण असून मागील आठवड्याच्या तुलनेत दुप्पट वाढ झाल्याचं दिसुन येत आहे. मागील आठवड्यात राज्यात ३, १४२ नवीन रुग्णांची नोंद झाली होती.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version