कोरोनाने संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. जगात काही ठिकाणी कोरोना परिस्थिती स्थिरावली आहे तर काही ठिकाणी पुन्हा कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अमेरिका, जर्मनी, इंग्लंड, फ्रान्स, नेदरलॅंड येथे मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोना विषाणूची तिसरी लहर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
इंग्लंडमध्ये दैनंदिन नवीन रुग्ण १,००,०००च्या पुढे गेली आहे. तर युनाटेड किंगडममध्ये कमीत कमी एक डोस घेतलेल्याचें प्रमाण ७५.७७ टक्के आहे आण दोन्ही डोस पूर्ण झालेल्यांचे प्रमाण ६९.३३ टक्के इतके आहे. तर दैनंदिन मृत्यू साधारणपणे १००च्या आसपास असून ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येतही वेगाने वाढ होत आहे.
फ्रांसमध्ये दैनंदिन ८०,००० हजार नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत तर कमीत कमी एक डोस घेतलेल्या लोकांचे प्रमाण ७८.०६ टक्के इतके आहे. आणि दोन्ही डोस पूर्ण झालेल्यांचे प्रमाण ७२.९० टक्के इतके आहे. दरम्यान दैनंदिन मृत्यूंचे प्रमाणही १००पेक्षा अधिक आहे.
कोरोनाकाळातील आतापर्यंतची सर्वात मोठी लाट नेदरलॅंडमध्ये आली आहे. मात्र सद्या दैनंदिन रुग्णसंख्येत काही प्रमाणत घट झाली असून कमीत कमी एक डोस घेतलेल्या लोकांचे प्रमाण ७७.४९ टक्के इतके आहे. तर दोन्ही डोस पूर्ण झालेल्यांचे प्रमाण ७४.६५ टक्के आहे.
अमेरिकेत कोरोना रुग्णसंख्या काही प्रमाणात घटली असून दैनंदिन मृत्यू १०००च्या आसपास आहेत. अमेरिकेत कमीत कमी एक डोस झालेल्यांचे प्रमाण ७२.९८ टक्के आहे तर दोन्ही डोस पूर्ण झालेल्यांचे प्रमाण ६१.३९ टक्के इतके आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.