कुकर ठरला वडापाव विक्रेत्याच्या मृत्यूचं कारण…

कुकर ठरला वडापाव विक्रेत्याच्या मृत्यूचं कारण…

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

कुकरचा स्फोट झाल्यानं वडापाव विक्रेत्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. नाशिकच्या जेलरोड अयोध्या नगरमध्ये घटना झाली.

 

वडापाव विक्रेता अशोक पाटील असं या मृत व्यक्तीच नाव आहे. कुकरमध्ये बटाटे शिजवण्यासाठी टाकले असता अचानक कुकरचा स्फोट झाला. या घटनेत कुकरचे तुकडे उडल्यानं पाटील यांच्या पोटाला गंभीर दुखापत झाली.

 

त्यांना उपचाराठी खाजगी रुग्णालयात दाखल केलं असता काही तासाने त्यांचा दुर्दवी मृत्यु झाला. या घटनेनंतर कुकर वापरतांना त्यांची शिट्टी, रबरी रिंग तसंच कुकरची वेळेवर सर्व्हिसिंग करणं गरजेचं असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version