‘या’ पुस्तकात तुकाराम महाराजांबद्दल वादग्रस्त मजकूर

‘या’ पुस्तकात तुकाराम महाराजांबद्दल वादग्रस्त मजकूर

समर्थ श्री रामदास स्वामी या पुस्तकात संभाजी महाराजांबाबत वादग्रस्त लिखाणाची बातमी ताजी असतानाच ‘संतांचे जीवन प्रसंग’ या पुस्तकातील धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

या पुस्तकात तुकाराम महाराजांच्या बायकोबद्दल आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आला आहे.

तुकाराम महाराजांची बायको फार रागीट, तोंडाला कुत्रे बांधावे ना तसे, तिच्या तोंडून कायम नेहेमी शिव्याच बाहेर यायच्या.

‘ते आमचं येडं’ असं आपल्या पतीला ती म्हणायची, असा मजूकर पुस्तकात छापण्यात आला आहे.

गोविंद तळवलकर यांनी या पुस्तकाचं लिखाण केलं आहे, दरम्यान या पुस्तकावर संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतला आहे.

अशा मजकुरांमधून चुकीचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्याचा प्रकार सुरू आहे, संबंधितांवर कठोर कारवाई करावी आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version