विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचा व्हिडीओ स्टिंग सादर केला. तसेच फडणवीसांनी प्रवीण चव्हाण यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या आक्षेपानंतर वादग्रस्त प्रवीण चव्हाण यांनी राजीनामा दिला असून मविआकडून प्रवीण चव्हाणला पदमुक्त करण्यात आले आहे.
वादग्रस्त सरकारी वकील प्रवीण चव्हाण याच्यावर विधानसभेत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. प्रवीण चव्हाण भाजपातील नेत्यांच्या विरोधात कुंभाड रचत असल्याचा आरोप फडणवीसांनी चव्हाणवर केला आहे. तसेच फडणवीसांनी प्रवीण चव्हाण याच्या वक्तव्याची व्हिडिओ स्टिंग विधानसभेत अध्यक्षांना सादर केली. या व्हिडिओ स्टिंगमध्ये प्रवीण चव्हाण मविआमधील अनेक नेत्यांच्या हवाल्याने भाजपा नेत्यांच्या विरोधात षडयंत्र रचत असल्याचे समोर आले.
देवेंद्र फडणवीसांनी या व्हिडिओ स्टिंग प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र, सत्ताधारी पक्षाने ही मागणी मान्य न करता फडणवीसांनी केलेल्या आरोपांची सीआयडीमार्फत चौकशी करण्याची मागणी सत्ताधारी नेत्यांची आहे. याचा भाजपाने निषेध केला असून विधानसभेतून विरोधी पक्षाने सभात्याग केला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.