मुंबई – पुणे एक्स्प्रेस वेवर कंटेनरची गाड्यांना धडक

मुंबई – पुणे एक्स्प्रेस वेवर कंटेनरची गाड्यांना धडक

पुणे, २१ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : मुंबई – पुणे एक्स्प्रेस वेवर कंटेनरची गाड्यांना धडक बसली. या अपघातात दोनजणांचा मृत्यू झाला आणि पाचजण जखमी झाले. एक्सप्रेस वेवर पुण्यापासून ३५ किमी अंतरावर मैलाच्या दगडाजवळ अपघात झाला. सकाळी नऊ वाजता हा अपघात झाला.

मुंबईकडील लेन सोडून कंटेनर पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर गेला आणि उलटला. या अपघातात पाच चारचाकी वाहनांचे नुकसान झाले. अपघातात एक महिला प्रवासी आणि एका चारचाकी वाहनाचा चालक अशा दोनजणांचा मृत्यू झाला. या व्यतिरिक्त दोन महिलांसह एकूण पाचजण जखमी झाले. जखमींना एमजीएम रुग्णालय कामोठे येथे दाखल करण्यात आले आहे. प्रशासनाने अपघातामुळे नुकसान झालेली सर्व वाहने हटवून वाहतूक सुरळीत केली आहे. पाऊस सुरू असल्यामुळे वाहने सावकाश चालवा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version