बांधकाम व्यावसायिकेवर गोळीबार

बांधकाम व्यावसायिकेवर गोळीबार

नवी मुंबई आणि पनवेल सध्या गुन्हेगारीचे केंद्रबिंदु होत आहे. पनवेल येथे बांधकाम आणि रियल इस्टेटचा व्यवसाय करणाऱ्या एका महिला व्यावसाईकावर गोळीबार करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेत ही महिला किरकोळ जखमकी झाली आहे.स्नेहल पाटील असे हल्ला झालेल्या बांधकाम व्यावसायिक महिलेचे नाव आहे. हल्लेखोरांनी मंगळवारी रात्री त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांच्या पायाला गोळी लागली. त्यांना उपचारासाठी नेरुळमधील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती ठीक आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरावर गुन्हा दाखल केला आहे.

स्नेहल पाटील या पनवेलवरुन उरणला जात होत्या. मंगळवारी रात्री, काही हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. स्नेहल पाटील या त्यांच्या मावस भावासोबत होत्या. त्या गव्हाण फाटा येथे आल्या असता त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. गोळी स्नेहल पाटील यांच्या पायाला लागली. त्यांना तातडीने उपचारासाठी नेरुळ इथल्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर झालेला हा हल्ला व्यावसाईक वादातून झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version