समीर वानखेडेंना राष्ट्रीय मागसवर्ग आयोगाकडून दिलासा

समीर वानखेडेंना राष्ट्रीय मागसवर्ग आयोगाकडून दिलासा

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांना राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडून दिलासा मिळाला आहे. समीर वानखेडे यांच्या चौकशीसाठी तयार करण्यात येणारे विशेष तपास पथक रद्द करण्याचे आदेश राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने दिले आहेत.

राष्ट्रीय मागसवर्ग आयोगाने महाराष्ट्राचे मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, पोलीस महासंचालक संजय पांडे, मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबतचे पत्र पाठवले आहे. त्यानुसार राष्ट्रीय मागसवर्ग आयोगाने समीर वानखेडे यांना अनुसूचित जाती जमातीचे संरक्षण दिले आहे. तसेच समीर वानखेडे यांच्या विरोधात विरोधातील एसआयटी रद्द करण्याचा आदेश राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने दिला आहे.

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप केले होते. त्यामुळे समीर वानखेडे यांनी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे धाव घेतली. याप्रकरणी सुनावणी पार पडली असून समीर वानखेडेंच्या चौकशीसाठी राज्य सरकारकडून नेमण्यात आलेली समिती रद्द करण्यात यावी, असे आदेस राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने दिले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version