राहुल गांधी यांनी पदाभार स्वीकारल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला जल्लोष

राहुल गांधी यांनी पदाभार स्वीकारल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला जल्लोष

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

काँग्रेस पक्षाकडून सोमवारी पक्षाचे नवे अध्यक्ष म्हणून राहुल गांधी यांच्या नावाची औपचारिक घोषणा करण्यात आली. 4 डिसेंबरला राहुल गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

 

 राहुल यांना अध्यक्षपदासाठी कोणीही आवाहन न दिल्यामुळे त्यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. या पार्श्वभूमीवर आज दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात राहुल गांधी यांनी  पदभार स्वीकारले.

 

त्यासाठी दिल्लीतील 24 अकबर रोडवरील पक्षाच्या मुख्यालयात कार्यकर्त्यांकडून जय्यत तयारी सुरु करण्यात आली होती. तर, काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते यांच्यात प्रचंड उत्साहात पाहायला मिळाला.

 

सोनिया गांधी आणि डॉ. मनमोहन सिंह यांच्यासह पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत राहुल गांधी पक्षाला नव्या रुपात पुढे नेण्यासाठी रुपरेषा मांडताना आपल्याला पहायला मिळाले.

 

राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मुंबईतील टिळक भवन दादर येथे काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहायला मिळाला. कार्यकर्त्यांनी फटाके फोडून मिठाई वाटत ढोल ताशांच्या गजरात जल्लोष साजरा केला. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version