काँग्रेस- राष्ट्रवादीच्या हल्लाबोल मोर्चाला तुफान गर्दी; विधानसभेतही सरकारला घेरण्याचा प्रयत्न

काँग्रेस- राष्ट्रवादीच्या हल्लाबोल मोर्चाला तुफान गर्दी; विधानसभेतही सरकारला घेरण्याचा प्रयत्न

जय महाराष्ट्र न्यूज, नागपुर

 

काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज्य सरकार विरोधात नागपूरच्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर काढण्यात येणाऱ्या ‘जनआक्रोश-हल्लाबोल’ मोर्चाला तुफान गर्दी पहायला मिळाली.

मोर्चासाठी दोन्ही पक्षाचे राज्यभरातील हजारो कार्यकर्ते नागपूरच्या रस्त्यावर उतरले. कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह असून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जातेय.

काँग्रेस नेते गुलामनबी आजाद व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार या मोर्चात सहभागी होण्यासाठी नागपुरात दाखल झालेत. मोर्चात जमलेली गर्दी सत्ताधाऱ्यांच्या मनात धडकी भरविणारी आहे.

आज विधानसभेत पुन्हा विरोधकांनी सरकारला घेरलाय. शेतकरी प्रश्नावर विरोध करत असतानाच विरोधक व्हेलमध्ये उतरलेत. विरोधकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली.

विरोधी पक्षांच विधानभवनाच्या पायऱ्यांवर धरणे आंदोलन आणि घोषणाबाजी केली. एकंदर विधिमंडळात आणि बाहेर दोन्हीकडे सरकारला घेरायचे विरोधकांनी ठरवलंय. तेव्हा आता या अधिवेशनात विधेयकं सरकार कसं पार करतं हे महत्त्वाचं ठरणार आहे.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version