धुळे जिल्हाधिकाऱ्यांची सत्ताधारी काँग्रेसला जबरदस्त चपराक

धुळे जिल्हाधिकाऱ्यांची सत्ताधारी काँग्रेसला जबरदस्त चपराक

जय महाराष्ट्र न्यूज, धुळे

 

धुळे जिल्हाधिकाऱ्यांनी शिरपूर नगरपरिषदेतील विरोधी नगरसेवकांच्या अपात्रता संदर्भातील अपील फेटाळला असून सत्ताधारी काँग्रेसला चांगलीच चपराक लगावली.

 

नोव्हेंबर 2016 मध्ये शिरपूर नगरपरिषदेची पंचवार्षीक निवडणूकीनंतर 9 नगरसेवकांनी एकत्र येऊन आपला वेगळा गट स्थापन केला होता. या कारणावरून त्यांना अपात्र

ठरविण्यात यावे अशी मागणी करत सत्ताधारी काँग्रेसच्या 2 नगरसेविकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील दाखल केले होते.

 

मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर या 9 नगरसेवकांना कायद्यानुसार पात्र ठरवले असून अपात्रतेचे अपील फेटाळून लावलेत. मात्र या निर्णयामुळे,

काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची चर्चा शिरपूरच्या राजकीय वर्तुळात रंगली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version