शिवप्रतिष्ठानचे अद्यक्ष संभाजी भिडे यांनी राष्ट्रपुरुषांबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी धुळे शहरातील जुन्या महानगरपालिकेसमोर राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या कार्यकर्त्यांनी संभाजी भिडे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारत पुतळ्याचे दहन केलं. यावेळी बेताल वक्तव्य करणाऱ्या भिडेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी आणि महात्मा ज्योतीराव फुले यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्ये केल्याने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासह राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विरोधात भिडे यांनी वादग्रस्त वक्तव्य करून त्यांचा अवमान केल्याचा आरोप यावेळी ओबीसी सेलच्या वतीने करण्यात आला. दरम्यान संभाजी भिडे यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या वतीने करण्यात आली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.