सुप्रिया सुळे यांच्या प्रतिक्रियेमुळे वाढला गोंधळ

सुप्रिया सुळे यांच्या प्रतिक्रियेमुळे वाढला गोंधळ

सावित्रीबाई वसतीगृहातील घटना ताजी असतानाच आत्ता मुंबई मध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उभा राहिला आहे. मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनमध्येच मुली सुरक्षित नाहीत. धावत्या लोकल ट्रेनमध्ये एका २० वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आणि त्यावरून राजकीय प्रतिकिया यायला सुरुवात झाली आहे. या प्रकरणावरून सुप्रिया सुळे यांनी ट्विट केले आणि त्याला प्रतिउत्तर देत चित्रा वाघ यांनी सुप्रिया यांच्यावर निशाणा साधला आहे.

“चालू लोकलमध्ये महिलांच्या डब्यात चढून एका व्यक्तीने तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली. ही अतिशय संतापजनक घटना आहे.यामुळे पुन्हा एकदा मुंबई लोकलच्या सुरक्षेचा प्रश्न पुढे आला आहे. महाराष्ट्रात गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिलेली नसून याला गृहखात्याची निष्क्रियता कारणीभूत आहे. या घृणास्पद घटनेतील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी तपासयंत्रणांनी कार्यवाही करणे गरजेचे आहे.” सुप्रिया सुळे यांच्या प्रतिक्रियेमुळे राजकीय प्रतिक्रियांमुळे वातावरण गढूळले आहे.

त्यावर चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करत सुनावलंय “अहो महाराष्ट्राच्या मोठ्ठ्या ताई, काविळ झालेल्यांना जग जसं पिवळं दिसतं तसं तुमचं झालंय. सत्तेचा स्ट्राईक रेट कमी झाल्याचा हा परिणाम आहे हे आम्ही समजू शकतो पण लोकलमध्ये महिलेवर बलात्कार झाल्याचं एवढं मोठ्ठं स्टेटमेंट करण्याआधी मोठ्ठ्या ताईंनी थोडी शहानिशा तरी करायला हवी होत” असे ट्विट करत चित्र वाघ यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर हल्लाबोल केला

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version