LPG Gas e-KYC Mandatory : LPG ग्राहकांनो लक्ष द्या! घरगुती गॅससाठी e-KYC अनिवार्य; सरकारने दिली अंतिम मुदत

LPG Gas e-KYC Mandatory : LPG ग्राहकांनो लक्ष द्या! घरगुती गॅससाठी e-KYC अनिवार्य; सरकारने दिली अंतिम मुदत

मुंबई : घरगुती LPG गॅस ग्राहकांसाठी केंद्र सरकारने ई-केवायसी करणे अनिवार्य केले आहे. यासाठी 16 ऑगस्ट 2026 ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. सबसिडी चालू ठेवण्यासाठी आणि गॅस सेवा खंडित होऊ नये म्हणून ग्राहकांना आता कोणत्याही गॅस एजन्सीच्या दारात रांगेत उभे न राहता घरबसल्या अत्यंत सोप्या डिजिटल पद्धतीने ई-केवायसी पूर्ण करता येणार आहे. मोबाईल ॲपच्या माध्यमातून गॅस सिलिंडरची पेपरलेस ई-केवायसी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ग्राहकाला फक्त स्वतःचा आधार क्रमांक, लिंक असलेला मोबाईल नंबर आणि फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञानाचा वापर करून अवघ्या 5 मिनिटांत ही प्रक्रिया मोफत पूर्ण करता येईल. ज्यामुळे ग्राहकांचा वेळ वाचून गॅसची सबसिडी थेट बँक खात्यात सुरक्षित राहील.

हेही वाचा : Maharashtra Weather : राज्यातील या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा, कोकणासह विदर्भात यलो अलर्ट जारी; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यांतील पावसाची स्थिती

देशातील सर्व घरगुती LPG गॅस ग्राहकांसाठी केंद्र सरकार आणि सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण म्हणजेच e-KYC करणे अनिवार्य केले आहे. स्टोरीबोर्ड 18 च्या अधिकृत वृत्तानुसार, ज्या ग्राहकांनी अद्याप आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यांच्यासाठी 16 ऑगस्ट 2026 ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. जर तुम्ही या मुदतीपूर्वी ई-केवायसी पूर्ण केली नाही, तर तुम्हाला घरगुती गॅस सिलिंडर सवलतीच्या दरात मिळणार नाही आणि गॅस सबसिडी देखील बंद होऊ शकते, असेही निर्देश सरकारने दिले आहेत. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version