पोद्दार कॉलेजच्या ‘एनिग्मा एक्सपेड 2018’ कॉलेज फेस्टची धमाकेदार ‘स्टार्ट’!

पोद्दार कॉलेजच्या ‘एनिग्मा एक्सपेड 2018’ कॉलेज फेस्टची धमाकेदार ‘स्टार्ट’!

जय महाराष्ट्र वेब न्यूज, मुंबई

 

कॉलेजियन्सना मुख्य आकर्षण असतं ते म्हणजे कॉलेज फेस्टिवल्सचं…

धमाल, दंगा, नाच गाणी यांच्याबरोबरच आपल्यातील कला मोठ्या मंचावर सादर करायची संधी मिळते ती या कॉलेज फेस्ट्समधूनच… 

वेगवेगळ्या टीम्स एकत्रितपणे दिवसरात्र काम करत असतात…

जे मंचावर कला सादर करत नाहीत, तेसुद्धा रात्र रात्रभर जागून हा युथ फेस्टिवल यशस्वी करण्यासाठी धडपडत असतात…

पोस्टर्स रंगवणं, बॅनर्स लावणं यांसारख्या छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये सगळा तरुणाईचा उत्साह  आपली क्रिएटिव्हिटी व्यक्त करत असतो.

आणि जेव्हा फेस्ट सुरू होतो, तेव्हा तर विचारूच नका…

फुल्ल ऑन धम्माल असते…

मुंबईच्या कॉलेजियन्सला आता वेध लागलेयत ते त्यांच्या लाडक्या ‘एनिग्मा एस्कपेड’चे…

माटुंगा येथील पोद्दार कॉलेजचा हा कॉलेज फेस्टिवल म्हणजे मुंबई युथसाठी पर्वणीच…

दरवर्षीप्रमाणे यंदाचा एनिग्मा ही वेगवेगळ्या इव्हेंट्स आणि टॅलेंट शोंनी खचाखच भरलाय. 

कोणकोणते शो या फेस्टमध्ये सादर होणार आहेत…

कोणत्या स्पर्धेत कोण बाजी मारणार आहे?

आणि कोण यंदाचा एनिग्मा गाजवणार आहे, याचे सगळे अपडेट्स तुम्हाला मिळतील फक्त ‘जय महाराष्ट्रवर’च…

काय तरुणांना प्रोत्साहन देणारी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी आहे ‘एनिग्मा एस्कपेड 2018’ ची EXCLUSIVE REGIONAL MEDIA PARTNER…

तर व्हा सज्ज… ‘एनिग्मा एस्कपेड 2018’चे एकाहून एक अपडेट्स जाणून घ्यायला…

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version