नारळाचं झाड कोसळून जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू

नारळाचं झाड कोसळून जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

नियतीच्या मनात काय चालत असेल कधीच कळत नाही. अगदी चालता चालताही जिवघेणा अपघात होऊ शकतो. अगदी मनात नसतानाही अघटीत घडू शकतं. अगदी असाच दुर्दैवी अपघात मुंबईच्या चेंबुरमध्ये घडला आहे. ज्यात महिलेला आपले प्राण गमवावे लागले.

 

स्वस्तिक पार्क इथं रस्त्यावर चालत असलेल्या महिलेच्या अंगावरच नारळाचं झाड कोसळून महिलेचा मृत्यू झाला. अगदी दुर्घटनेची कल्पनाही केली नसताना कांचन नाथ नावाच्या या महिलेच्या डोक्यावरच झाड कोसळलं. हा आघात एवढा प्रचंड होता की त्या जागेवरच बेशुद्ध पडल्या. त्यांच्या डोक्याला प्रचंड मार लागला.

महिलेच्या डोक्यावर झाड पडल्यानंतर आजुबाजुच्या नागरिकांनी तातडीनं धाव घेतली. पण जबर मार लागल्यानं ती महिला निपचीत पडली होती. गंभीर जखमी झालेल्या या महिलेला अखेर स्थानिकांच्या मदतीनं रुग्णालयात भरती करण्यात आलं. पण उपचारादरम्यान तीचा मृत्यू झाला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version