Nagpur FDA Raid: सूपमध्ये झुरळ, फ्रिज उघडून पाहिल तर…, नागपूरच्या रेस्टॉरंटमध्ये अन्नसुरक्षेचा बोजवारा; FDA कडून थेट लायसन्स सस्पेंड

नागपुरात अन्नसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. नागपूरच्या सदर भागातील एका रेस्टॉरंटमध्ये किळसवाना प्रकार उघडकीस आला आहे.
Nagpur FDA Raid: सूपमध्ये झुरळ, फ्रिज उघडून पाहिल तर…, नागपूरच्या रेस्टॉरंटमध्ये अन्नसुरक्षेचा बोजवारा; FDA कडून थेट लायसन्स सस्पेंड

नागपुरात अन्नसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. नागपूरच्या सदर भागातील एका रेस्टॉरंटमध्ये किळसवाना प्रकार उघडकीस आला आहे. नागपूरच्या सदर भागातील अशोका रेस्टॉरंटमध्ये ग्राहकाला दिलेल्या सूपमध्ये मेलेला झुरळ आढळल्याने खळबळ उडाली आहे. नागपुरातील कुणाल नरसापूरकर यांनी कुटुंबासह भोजनादरम्यान हा प्रकार उघडकीस आणला. तक्रार मिळताच अन्न व औषध प्रशासन (FDA) पथकाने रेस्टॉरंटवर धाड टाकली.

ग्राहकाला दिलेल्या सूपमध्ये चक्क मेलेला झुरळ आढळला. यासंदर्भात तक्रार प्राप्त होताच अन्न व औषध प्रशासन विभागाने हॉटेलचा परवाना निलंबित केला आहे. त्याचसोबत अधिक तपास केला असता अन्न व औषध प्रशासनाला स्वयंपाकघरात गंभीर अस्वच्छता आढळून आली. त्याचसोबत फ्रिजमध्ये शाकाहारी व मांसाहारी पदार्थ अयोग्य पद्धतीने साठविल्याचे समोर आले. त्रुटी दूर होईपर्यंत अशोका रेस्टॉरंटचा परवाना निलंबित करण्यात आला. ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा FDA ने दिला.

हेही वाचा- FDA Action : FDA चा मोठा छापा! जास्त दूधासाठी म्हशींना दिली जाणारी शेकडो इंजेक्शन्स जप्त; जनावरांसह मानवी आरोग्याच्या जीवाशी खेळ

मुंबईत उंदरांनी कुरतडलेल्या फळांची विक्री
 तर दुसरीकडे मुंबईतील बोरिवली पश्चिमेला फळ विक्रेत्याच्या दुकानाचा एक कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये फळांवर उंदीर ताव मारताना दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच उंदरांनी कुरतडलेली फळे फळविक्रेत्याने ग्राहकांना विकल्याचा आरोप सोशल मीडियावर करण्यात आला आहे.

सध्या पावसाळ्यात उंदरांमुळे प्लेग, लेप्टोस्पायरोसिससारख्या आजारांचा धोका वाढत असल्याने या फळविक्रेत्याच्या कृत्यावर नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी फळांना चमक आणण्यासाठी घातक रसायने वापरल्याचे आणि गटाराच्या पाण्यात फळे-भाज्या धुतल्याचे प्रकारही चर्चेत आले होते. असं असताना हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि स्थानिक प्रशासनाकडून व्हिडिओची सत्यता आणि संबंधित दुकानाची ओळख तपासण्याचे काम सुरू आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version