मुख्यमंत्र्यांचे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन

मुख्यमंत्र्यांचे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन

  एसटी महामंडळाने उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केल्यानंतरही एसटी कर्मचाऱ्यांनी संप सुरूच ठेवला. तसेच एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित केल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा संप अधिक व्यापक झाला आहे. त्यामुळे संपकारी एसटी कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केले आहे.

  एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहोत मात्र त्यासाठी कर्मचाऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन केले की, एसटी कर्मचारी तुम्ही आमचेच आहात, बाहेरचे नाही. त्यामुळे तुमच्या मागण्या मान्य करून दिलासा देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली असून समितीने काम सुरू केले आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारल्यामुळे गोरगरीब, सर्वसामान्य प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे प्रवाशांना वेठीस धरू नका असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एसटी कर्मचाऱ्यांना केले आहे.

  एसटी कर्मचाऱ्यांना माझी पुन्हा एकदा विनंती शासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करा. आपल्या राजकीय पोळ्या भाजू नका ही वेळ राजकारणाची नाही हे लक्षात घ्या. तसेच एसटी संपासंदर्भात सह्याद्रीवर संध्याकाळी ५ वाजता बैठक होणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version