नारायण राणे महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात दिसतील? फडणवीस-शाहांची तीन तास चर्चा

नारायण राणे महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात दिसतील? फडणवीस-शाहांची तीन तास चर्चा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

काँग्रेस नेते नारायण राणे नारायण राणे महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात दिसण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यात राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

अहमदाबादमध्ये फडणवीस-शाहांची तीन तास चर्चा झाली. या बैठकीत मुख्य मुद्दा होता तो म्हणजे नारायण राणे यांचा.

नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळात प्रवेशाबाबत फडणवीस-शाह यांच्यात प्रदीर्घ चर्चा झाली.

नारायण राणे यांनी नुकतंच काँग्रेसमधून बाहेर पडून, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष या स्वतंत्र पक्षाची घोषणा केली. त्यानंतर त्यांनी एनडीएला साथ दिली.

त्यामुळे राणेंना आता राज्य मंत्रिमंडळात स्थान द्यायचं का, दिलं तर त्यांना कोणतं मंत्रिपद द्यायचं हा प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version