थँक यू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; शेतकरी बहिणींनी मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

थँक यू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; शेतकरी बहिणींनी मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राज्यात रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हाच उत्साह मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर दिसला.

 

वर्षा बंगल्यावर राज्यभरातून शेतकरी बहिणी दाखल झाल्या होत्या, त्या आपल्या भावाला म्हणजे मुख्यमंत्र्यांना राखी बांधायला. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.

 

कारण आपल्या भावानं म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला सातबारा कोरा केल्याची भावना त्यांच्या डोळ्यात दिसत होती.

 

मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी केल्याबद्दल या शेतकरी बहिणींनी त्यांना राखी बांधली. महाराष्ट्र भाजप प्रदेश महिला मोर्चाच्या वतीनं 100 शेतकरी महिला वर्षा बंगल्यावर आल्या

होत्या. विविध स्तरातील आणि विविध जाती धर्मातल्या या भगिनींनी मुख्यमंत्र्यांचं औक्षण करुन त्यांना राखी बांधली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version