जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मागील तीन वर्षांमध्ये 9 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या असून, मोदींच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ झाली असल्याचे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी म्हटल आहे. त्यांच्या या आरोपाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे.
राहुल गांधींना शेती कळाली असती तर शेतकऱ्यांची ही परिस्थिती नसती अशी टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी राहुल गांधींवर केली.
तसेच मी 5 हजार कोटी देतो कर्जमाफी करून दाखवावी असं आव्हानं मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधींना केले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.