जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
कर्जमाफीच्या सरकारी समितीत शिवसेनेचा सदस्य असणार, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी शिवसेना मंत्र्यांना दिलं. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ही माहिती दिली.
कर्जमाफीबाबत कोणत्याही राजकीय पक्षाशी बोलणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली होती. त्यानंतर शिवसेना हा राजकीय पक्ष असून शिवसेनेशी चर्चा करणार की नाही, असा सवाल शिवसेनेनं केला होता.
दरम्यान, कर्जमाफीसाठी राज्य सरकारची जी समिती स्थापन होणार आहे. त्यात शिवसेनेच्या सदस्यांनाही घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.