कपटी मित्रापेक्षा दिलदार विरोधक बरा; मुख्यमंत्र्यांकडून शरद पवारांची तारीफ तर शिवसनेला टोमणा

कपटी मित्रापेक्षा दिलदार विरोधक बरा; मुख्यमंत्र्यांकडून शरद पवारांची तारीफ तर शिवसनेला टोमणा

जय महाराष्ट्र न्यूज, अमरावती

 

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा नागरी सत्कार सोहळा अमरावतीमध्ये पार पडला. या सोहळ्याला मुख्यमंत्री फडणवीस, आनंदराव अडडसूळ, अनिल बोनडे राजेंद्र गवईसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कपटी मित्रापेक्षा दिलदार विरोधक बरा असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांचे तोंडभरुन कौतुक केले. 

भारतीय राजकारणात शरद पवार यांची सलग 50 वर्षांची मोठी इनिंग असल्याचं यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेत. तसेच पवारांचा राजकारणात मोठ-मोठ्या क्षेत्रात ठसा उमटवला असल्याचं मुख्यमंत्री म्हणालेत.

महाराष्ट्राच्या हिताची बाब असेल तर शरद पवार यांनी मतांची चिंता कधीच केली नाही. वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आणि चुका दुरुस्त करणारे शरद पवारच आहेत, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं तोंडभरुन कौतुक केलं.

शरद पवार कृषी मंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात शेती क्षेत्रात सर्वोत्कृष्ट काम झालं. पवारांना संरक्षण खातं सहज मिळालं असतं. मात्र त्यांनी दहा वर्षे कृषी मंत्रालय सांभाळलं, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांच्या कारकीर्दीचं कौतुक केलं.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल शरद पवारांनी मार्गदर्शन केले. पवार राजकारणाच्या आणि पक्षाच्या पलीकडे पाहतात असेही मुख्यमंत्री म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version