उदयन राजे मुक्त विद्यापीठ, त्यांच्या स्टाइलवर कुणाचा आक्षेप असण्याच कारण नाही – मुख्यमंत्री

उदयन राजे मुक्त विद्यापीठ, त्यांच्या स्टाइलवर कुणाचा आक्षेप असण्याच कारण नाही – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कराड मध्ये पत्रकारपरिषद घेतली आहे. त्यांची महाजनादेश यात्रा सुरू असून पश्चिम महाराष्ट्रात उदयनराजेंच्या प्रवेशामुळे यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. असं मुख्यमंत्र्यांच म्हणणं आहे.  पृथ्वीराज चौहान यांच्या आरोपावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले आहे.

पृथ्वीराज चौहान  यांच्या आरोपावर मुख्यमंत्र्यांचे उत्तर

महाराष्ट्र गुंतवणुकींच्या बाबतीत 8 वा क्रमांक है पृथ्वीराज चौहान यांचा आरोप खोटा  आहे. आणीबाणीच्या काळात  लोकशाहीचा खून करणाऱ्या कांग्रेसला उदयनराजेंवर आरोप करण्याचा अधिकारी नाही.  पृथ्वीराज चौहान यांनी  उदयनराजे यांनी तीन महिन्यात खासदारकीचा राजीनामा दिला हा लोकशाहीचा खून केला असा आरोप केला होता.

सामनावर मुख्यमंत्यांची  सफाई

उदयन राजे मुक्त विद्यापीठ लोकांना जोपर्यंत त्यांची स्टाइल आवडत राहील तोपर्यंत कुणालाही त्यावर आक्षेप असण्याच कारण नाही अशी सफाई मुख्यमंत्र्यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखावर केला आहे.

सामनाच्या अग्रलेखातून  भाजपची शिस्त उदयनराजे पाळणार  का ?  असा सवाल शिवसेनेने केला होता.

शिवसेनेच्या राममंदिर मुद्द्यावर मुख्यमंत्री

राममंदिराची  पहिली विट कोण रचेल  ते आपण  नंतर पाहु पण राममंदिरवर शिवसेनेची भूमिका चांगली आहे. असं ही ते म्हणाले आहेत.

शरद पवारांवर टीका

पवार साहेब मोठे नेते आहेत.  त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की त्यांच्या वक्तव्याचा फायदा आपल्या देशाला होतो की दुसऱ्या देशाला होतो. पवार साहेब यांची ही गोष्ट योग्य नाही. पाकिस्तानची स्तुती केली तर भारतातील मुस्लिम आपल्याला मत देतील असं पवारांना वाटत असेल.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version