जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
दुष्काळाने ग्रासलेल्या राज्यातील आत्महत्याग्रस्त चौदा जिल्ह्य़ांसाठी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे 10 हजार 684 कोटी रूपयांच्या विशेष पॅकेजची मागणी केली आहे.
प्रामुख्याने मराठवाडा व विदर्भातील अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या दीर्घकालीन निधीचा या पॅकेजमध्ये समावेश आहे.
शेतीमधील गुंतवणुकीकडे कायम दुर्लक्ष झाल्याने शेतकऱ्यांवर ही स्थिती ओढवल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
शेतीमधील वाढविलेली गुंतवणूक, जलयुक्त शिवारचे यश आणि अपूर्ण सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी, केंद्राकडे विशेष पॅकेजची मागणी केली आहे.
तसेच जीएसटीसाठी विधिमंडळाचे मे महिन्यात विशेष अधिवेशन बोलाविणार असल्याचंसुद्धा मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.