नवी मुंबईत घर घेण्यासाठी सिडकोच्या परवानगीची गरज नाही; जमीन फ्री होल्ड करण्यास मुख्यमंत्र्यांचा ग्रीन सिग्नल

नवी मुंबईत घर घेण्यासाठी सिडकोच्या परवानगीची गरज नाही; जमीन फ्री होल्ड करण्यास मुख्यमंत्र्यांचा ग्रीन सिग्नल

जय महाराष्ट्र न्यूज, नवी मुंबई

 

आता नवी मुंबईत घर घेताना सिडकोच्या परवानगीची गरज पडणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व जमीन फ्री होल्ड करण्यासाठी हिरवा कंदील दिला आहे.

 

सरकारच्या या निर्णयामुळे  नवी मुंबईतील 5 लाख कुटुंबांना दिलासा मिळाला.  नवी मुंबईत इमारतीच्या पुनर्विकासासाठी सिडकोच्या परवानगीची गरज नसणार.

 

सिडको, एमडी, कोकण आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. त्यामुळे नवी मुंबईतील 344 चौरस किलोमीटरची जमीन फ्री होल्ड

होणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सिडको घरांसोबत खासगी घरांना देखील हा दिलासा मिळाला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version