जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
समृद्धी महामार्गाचे प्रमुख अधिकारी राधेश्याम मोपलवारांना अखेर पदावरून हटवण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतला.
चौकशी होईपर्यंत मोपलवार पदापासून दूर राहतील, अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत केली.
मुख्यमंत्र्यांचे ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्ध महामार्गाचं काम मोपलवारांना देण्यात आले. मात्र, राधेश्याम मोपलवारांवरील सेटलमेंटच्या आरोपामुळे विरोधकांनी सरकारला
धारेवर धरलं आणि त्यांना निलंबित करण्याची मागणी केली. मात्र, सरकारनं त्यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत पदावरून दूर केले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.