घाटकोपर इमारत दुर्घटनेतील मृतांना दोन लाखांची मदत करणार; मुख्यमंत्र्यांची माहिती

घाटकोपर इमारत दुर्घटनेतील मृतांना दोन लाखांची मदत करणार; मुख्यमंत्र्यांची माहिती

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

घाटकोपर इमारत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकार दोन लाखांची मदत करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधनसभेत

दिली.

 

विधानसभेत आज घाटकोपर इमारत दुर्घटनेबाबत चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकार दोन लाखांची मदत करणार असून,

जखमी झालेत त्यांच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगलीतले. या दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला आहे.

 

दुर्घटनाग्रस्त इमारतीमधील नर्सिंग होमच्या नूतनीकरणाचे काम सुरु होते. यामुळे इमारतीच्या मुळ बांधकामाला धोका पोहचवण्याचे काम झाल्याचा प्राथमिक अंदाज

आहे.  

 

या दुर्घटनेच्या चौकशीसाठी आयएस अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. या समितीला 15 दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात

आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगीतले.

 

चौकशी नंतर इमारतीच्या मुळ बांधकामामध्ये बदल करण्यात आल्याचे आढळले तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार. तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई

केली जाईल. इमारती मध्ये अशा प्रकारचे काम सुरु असल्याची कोणतीही तक्रार आली नव्हती असे मुख्यमंत्र्यांनी सांगीतले.

 

घरबांधण्याची परवानगी आता ऑनलाइन होत आहे. ज्या इमारतींना 30 वर्ष पूर्ण झाले आहेत त्या इमारतींना नोटीस जाईल. इमारत दुरुस्तीसाठी वास्तुविशारद प्रमाणपत्र

देण्याची तरतूद केली आहे.  हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर 24 तासाच्या आत ऑनलाइन परवानगी दिली जाईल. जर, प्रमाणपत्र चुकीचे आढळल्यास वास्तुविशारद यांच्यावर

ही कारवाई केली जाईल.  नोटीस दिल्यापासूननते कारवाई पर्यंत सिस्टीम तयार करण्यात आली आहे.

 

या सिस्टीमध्ये अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल. जर, मुंबई महापालिकेत ही यंत्रणा यशस्वी झाली तर राज्यातील इतर महापालिकांमध्ये देखील ही

यंत्रणा राबण्यात येईल. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version