‘सीएम म्हणजे करप्ट मॅन’

‘सीएम म्हणजे करप्ट मॅन’

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरु असलेल्या घडामोडींची जोरदार वेग घेतला आहे. त्यात सुरु असलेला सत्तासंघर्ष चांगलाच पेटला आहे. ताईत आदित्य ठाकरे यांनी ‘सीएम म्हणजे करप्ट मॅन’ असं म्हणत एकनाथ शिंदे यांना टोला लगावलाय.

काय म्हणाले आदित्य ठाकरे?
आमचं काम आम्हाला माहित आहे. मुंबईकरांना माहिती आहे. आणि म्हणूनच लोकं आम्हाला गेली २५ वर्षे निवडून देत आहेत. पण ज्यांच्यात हिंमत नाहीये, जे आधी नगरविकास मंत्री होते ते आता करप्ट मॅन म्हणजेच सीएम झाले आहेत. त्यांनी ठाणे महानगरपालिकेची अशीच चौकशी लावावी. नाशिक, नागपूरची देखील चौकशी लावावी मग बघू. त्यांनी आमच्यावर लावलेल्या चौकशीचं आम्ही स्वागत करतो. कारण लोकांना आमचं काम माहिती आहे. बाकीच्यांच्यात हिंमत असेल तर चौकशी लावून दाखवावी. आम्हाला बदनाम करण्यासाठी त्यांचं हे सर्व सुरु आहे. आमचं नाव आणि चिन्ह चोरलं आणि आता आडनाव चोरायचे प्रयत्न चालू आहेत. पण त्यांच्यात निवडणूक घेण्याची हिंमत नाहीये.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version