जय महाराष्ट्र न्य़ूज, मुंबई
एल्गार मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या प्रकाश आंबेडकरांना आता मुख्यमंत्र्यानी चर्चेचे निमंत्रण दिलं आहे. संभाजी भिडेंच्या अटकेची मागणी करत आज प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात मुंबईत एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु या मोर्चाला पोलीसांनी परवानगी नाकारली होती. त्यामुळे राज्यभरातून आलेले मोर्चेकरी सीएसएमटी येथे जमले. आणि नंतर आझाद मैदानावर या दलित बांधवांनी आंदोलन चालू केलंय. या आंदोलनातील एक शिष्टमंडळ चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं कळतंय.
कोरेगाव भीमा येथे जानेवारीत झालेल्या दंगलीला मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडेंनी चिथावणी दिल्याचा आंबेडकरांचा आरोप आहे. याप्रकरणी एकबोटे आणि भिडेंवर गुन्हेदेखील दाखल करण्यात आले होते. यापैकी एकबोटेंना तर अटक करण्यात आली, परंतु संभाजी भिडेंवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. यामुळेच संभाजी भिडेंना अटक व्हावी यासाठी हा मोर्चाचं आयोजन केलं गेलंय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.