जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणात चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभं राहावं लागणार आहे.
बचाव पक्षाच्या वकिलांकडून साक्षीदारांची यादी तयार करण्यात आली.
यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समावेश करण्यात आला. विधानसभेत तसंच वाहिन्यांच्या मुलाखतीमध्येही मुख्यमंत्र्यांनी आरोपीला फाशी देण्याचं वक्तव्य केलं होते.
त्यासोबतच उज्ज्वल निकम यांच्या नावाचाही साक्षीदारांच्या यादीत समावेश करण्यात आला. त्यांच्या नावावर 7 जुलैला सुनावणी होणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.