जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुंबईत झालेल्या रेल्वेहत्याकांडला एक महिना उलटूनही सरकारची अद्याप कोणत्याही प्रकारची हालचाल दिसत नाहीये. या रेल्वेहत्याकांडमध्ये अनेक प्रवाशांचे नाहक बळी गेले. या पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेमंत्री पियूष गोयल आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह एल्फिन्स्टनला मंगळवारी सकाळी भेट दिली.
मुंबईतील एल्फिन्स्टन पूल लष्कराकडून बांधला जाणार आहे. अशी घोषणा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली. तसेच 31 जानेवारी 2018 पर्यंत लष्कराचे जवान एलफिन्स्टन पूल बांधणार आहेत. असे देखील फडणवीस यांनी म्हटले आहे. एल्फिन्स्टनसोबतच करीरोड आणि आंबिवलीतील पूलही लष्कराकडून उभारले जाणार आहेत. अशा प्रकारची माहिती त्यांनी यावेळी दिली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.