मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ हेलिकॉप्टरची चौकशी 2 दिवसात संपली; प्रकरण दाबण्याचा प्रयत्न ?

मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ हेलिकॉप्टरची चौकशी 2 दिवसात संपली; प्रकरण दाबण्याचा प्रयत्न ?

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हेलिकॉप्टर हवेच्या दाबाने कासळल्याचा अहवाल देत, दोनच दिवसात अपघाताची चौकशी संपवण्यात आली.

 

अपघातग्रस्त हेलिकॉप्टरची चौकशी करण्यासाठी 8 ते 9 महिन्यांचा कालावधी लागतो. मात्र, ही चौकशी आटपती घेत हेलिकॉप्टर घटनास्थळावरून उचलण्यात आले.

 

मात्र, चौकशी घाईघाईने आटपल्याने अनेक प्रश्न अनुत्तरीत राहीलेत. लॅंडींगसाठी अडथळे असलेली जागा का निवडली ? त्यासाठी कोणी आग्रह केला ? कोणी निर्णय घेतला

या प्रश्नांची उत्तर समोर येणं गरजेच आहे. दरम्यान हे हेलिकॉप्टर मुंबईच्या दिशेने रवाना झाल असुन जुहू येथे असलेल्या इंदमर कंपनीमध्ये त्याची दुरुस्ती होणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version