चैत्यभूमीवर भीमसैनिकांचा जनसागर; मुख्यमंत्र्यांनीही केले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

चैत्यभूमीवर भीमसैनिकांचा जनसागर; मुख्यमंत्र्यांनीही केले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी चैत्यभूमीवर दाखल झालेत.

मुंबईत पावसाची रिपरिप असली तरीही भीमसैनिक मोठ्या संख्येने दाखल होतायेत. चैत्यभूमीला भीमसागराचे स्वरूप प्राप्त झालंय.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवानदन केले. यावेळी त्यांच्यासह शिक्षणमंत्री विनोद तावडे, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर आदी उपस्थित होते.

यासह राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी देखील चैत्यभूमीवर जाऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली.

इंदू मिलमधील बाबासाहेबांच्या स्मारकाच्या प्रत्यक्ष कामाला महिनाभरात सुरुवात होईल, टेंडर निघालं असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी चैत्यभूमीवर दिली. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version