आमिर खान मंत्रालयात आला आणि थेट मुख्यमंत्र्यांना भेटला

आमिर खान मंत्रालयात आला आणि थेट मुख्यमंत्र्यांना भेटला

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई  

 

बॉलिवुडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान मंत्रालयात आला अन् थेट त्यानं गाठलं सहाव्या मजल्यावरचं मुख्यमंत्र्यांचं दालन. सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेच्या पुढच्या टप्प्याच्या निमित्तानं त्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. 

याबाबतचे ट्वीट मुख्यमंत्र्यांनी केलं. 

24 जिल्ह्यातील 75 तालुके या सत्यमेव जयतेच्या तिसऱ्या पर्वात भाग घेऊ शकणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी सर्व सरपंचांना सत्यमेव जयते या अभियानात भाग घेण्याचं आवाहन केलंय.

आमिर खाननं सत्यमेव जयतेच्या तिसऱ्या पर्वात मातीचा कस वाढवनं, हरीत जमिनीत वाढ करणं, वनीकरण आणि पाण्याचा वापर यांसारख्या बाबींचा समावेश करण्याच आलाय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version