राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात वस्त्र संहिता लागू आहे. देशातील अनेक मंदिरे, गुरुद्वारा, चर्च, मशिदी आणि इतर प्रार्थना स्थळी वस्त्र संहिता लागू आहे, त्याच धर्तीवर राज्यातील मंदिरांमध्ये वस्त्र संहिता लागू करत असल्याचं महासंघाचे समन्वयक सुनील घनवट यांनी सांगितलंय.
महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने नागपुरातील चार मंदिरात वस्त्र संहिता लागू करण्यात आलीय. मंदिरातील पावित्र्य जपण्यासाठी ही वस्त्र संहिता लागू केल्याचं महासंघाच्या वतीने आज पत्रकार परिषद घेऊन जाहीर करण्यात आलं. राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात वस्त्र संहिता लागू आहे, देशातील अनेक मंदिरे, गुरुद्वारा, चर्च, मशिदी आणि इतर प्रार्थना स्थळी वस्त्र संहिता लागू आहे, त्याच धर्तीवर राज्यातील मंदिरांमध्ये वस्त्र संहिता लागू करत असल्याचं महासंघाचे समन्वयक सुनील घनवट यांनी सांगितलंय. महाराष्ट्रातील ३०० हुन अधिक मंदिरात ही वस्त्र संहिता लागू केली जाणार आहे.
देशभरातील अनेक मोठ्या मंदिरांमध्ये आधीच वस्त्र संहिता आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात सर्व मंदिरात ती लागू व्हावी अशी आमची भूमिका आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघाची नागपुरात पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत सुनील घनवट यांनी ही माहिती दिली आहे. जर कोणी मंदिरात अशोभनीय, तोकडे कपडे घालून आले तर त्याला परत पाठवण्याऐवजी मंदिराच्या प्रवेशद्वारावर शॉल, ओढणी, धोतर असे कपडे देण्यात येणार आहे. भाविकाला ते वापरून पांघरून मंदिरात जाता येणार आहे. ड्रेसकोडबाबत मंदिराने कडक नियम घालून दिले आहेत. केवळ महिलाच नाही तर पुरुषांसाठी देखील हे नियम आहेत.
काही दिवसांपूर्वी तुळजाभवानी मंदिरामध्ये प्रवेशासाठी मंदिर संस्थांनाच्यावतीने एक नियमावली जारी करण्यात आली होती. त्या नियमावलीचे फलक हे मंदिरात लावण्यात आले आहेत. बरमोडा, हाफ पॅन्ट, उत्तेजक कपडे तसेच अंग प्रदर्शन करणारे कपडे घातलेले अशा भाविकांना मंदिरात प्रवेश मिळणार नाही असे म्हटले गेले होते. त्यावरून मोठा गदारोळ झाला होता. त्यानंतर मंदिर प्रशासनाने यू टर्न घेत पूजेसाठी अथवा दर्शनासाठी आलेल्या कोणत्याही भाविकांना कोणतेही निर्बंध नसल्याचे सांगितले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.