संत निरंकारी मिशनतर्फे “स्वच्छ पाणी, स्वच्छ मन” अभियान

संत निरंकारी मिशनतर्फे “स्वच्छ पाणी, स्वच्छ मन” अभियान

स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त संत निरंकारी मिशनच्या वतीने अमृत प्रकल्पांतर्गत देशभरात “स्वच्छ पाणी, स्वच्छ मन” अभियान राबविण्यात आले. या अमृत प्रकल्पांतर्गत संत निरंकारी मिशनच्या हजारो स्वयंसेवकांनी मुंबईतील अनेक समुद्रकिनारे स्वच्छ केले आहेत. याशिवाय मुंबई ते सुरत आणि गोवा ते कोकण किनारपट्टी परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. दादर चौपाटी, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी, माहीम चौपाटी आणि मुंबईतील इतर समुद्रकिनाऱ्यांवरही स्वच्छतेचे आयोजन करण्यात आले होते ज्यात शेकडो निरंकारी स्वयंसेवक सहभागी झाले होते.

जलसंधारण आणि त्याच्या संरक्षणासाठी अवलंबल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची आखणी आणि अंमलबजावणी करणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. निरंकारी बाबा हरदेव सिंह जी महाराज यांनी समाजाच्या कल्याणासाठी अनेक कामे केली, ज्यामध्ये स्वच्छता अभियान आणि वृक्षारोपण प्रमुनगरसेव आणि त्यांच्या शिकवणीतून प्रेरणा घेऊन दरवर्षीप्रमाणे निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संत निरंकारी मिशनतर्फे अमृत प्रकल्पाचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रकल्पांतर्गत संत निरंकारी मंडळाच्या स्वयंसेवकांनी देशातील २७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील ७३० शहरांमध्ये एक हजाराहून अधिक ठिकाणी जलसंधारण आणि जलकुंभांची स्वच्छता केली. यामध्ये समुद्रकिनारे, नद्या, तलाव, पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करण्यात आली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version